"पालकवृंदांसाठी संदेश"



 

प्रिय पालकवृंद,

    आपल्या कै. आप्पासाहेब मुसळे मतिमंद निवासी विद्यालय दासखेड ता. पाटोदा जि. बीड. या शाळेत मुखाध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारताना अत्यंत अभिमान वाटत आहे. शाळेचा उद्देश मतिमंद विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षण व मार्गदर्शन देऊन स्वावलंबी बनवणे आहे. त्यांच्या कौशल्यविकासासाठी विविध उपक्रम व कार्यशाळा राबवून, आम्ही त्यांना एक उज्ज्वल भविष्य घडविण्याचा प्रयत्न करणार आहोत.

    आपल्या मुलांच्या शिक्षणप्रवासात सहकार्य देण्याची विनंती आहे. आपल्या विश्वासाने, आम्ही आपल्या मुलांच्या यशासाठी एकत्रित प्रयत्न करू.

धन्यवाद!


प्रा. श्री. नवले भागवत सुनील

मुख्याध्यापक,
कै. आप्पासाहेब मुसळे मतिमंद निवासी विद्यालय,
दासखेड ता.पाटोदा जि.बीड.